वाघाचे हल्ल्यात शेतकरी जागीच ठार

1356

राजुरा
मध्य चांदा वन विभाग अंतर्गत येत असलेल्या राजुरा तालुक्यातील विरुर वन परिक्षेत्र नवेगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 145 मध्ये नवेगाव येथील गोविंदा भीमराव मडावी यांच्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे. काही महिन्यापुर्वीच याच गावातील एका शेतमजुराचा वाघाचे हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती ,
विशेष म्हणजे मागील 6 महिने पासून राजुरा व विरुर वनक्षेत्रात वाघाने धुमाकूळ घातला असून त्याने आतापर्यंत 6 सहा जणांचा बळी घेतला आहे यामुळे या भागात वाघाची प्रचंड दहशत आहे त्याला पकडण्यासाठी वनविभागाचे चमू रात्र दिवस जागरण करीत असूनही वाघ मात्र वन कर्मचाऱयाच्या तावडीत सापडला नसल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून आता या वाघाला ठार माराच अशी आग्रही मागणी केली जात आहे