धक्कादायक….! बारा वर्षाच्या बालिकेवर काकाने केला बलात्कार 

955

गोंडपिपरी तालुक्यातील येथबोथल्यातील संतापजनक घटना

गोंडपिपरी

घरात आजोबाचा मृत्यू झाला.यानंतर रिजीरिवाजानूसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मयतीसाठी आलेल्या पाहुण्यांना जेवनाची पंगत वाढत असतांना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली.तिला ओढत घराशेजारी असलेल्या बांबुच्या रांजीत नेले.व तिथेच तिच्यावर बलात्कार केला.गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला गावात काल रात्री साडेनउ वाजताच्या सुमारास हा संतापदायक प्रकार समोर आला.

गोंडपिपरी तालुक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर येन बोथला गावातील मोरेश्वर राऊत यांच्या वडिलांचे काल निधन झाले दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी पाण्यासह जेवण करायला बसले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी वरती काळी नजर ठेवली. पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली.यावेळी कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी कमलाकर राऊत याने तिला ओळखत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला काहीवेळातच मुलीचे वडील मोरेश्वर राऊत हे घराबाहेर निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला.आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असतात घटनास्थळावरून आरोपी कमलाकर राउत यांनी पळ काढला. मुलीची अवस्था पाहून वडील चक्रावून गेले घरी आणत तिला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर बळजबरीने ओळखत नेत बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना सांगितली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत यांनी माझ्यावरती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना हि बाब सांगितली नाही.मुलीवरती झालेला अत्याचार पाहून आईवडिलांनी लगेचच रात्री अकरा वाजता गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप दुबे यांनी आपल्या सहका-यासह येनबोथला गाव गाठले व गावा पासून एक किलोमीटर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. पीडित मुलीला मेडिकल करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर आरोपीविरुद्ध ३७६,३७६(२)(प्)(छ)(थ्)५०६, कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोस्को टीम राजुरा यांच्याकडे तपास दिला आहे सदर घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट दिली.व प्रकरणाची माहिती घेतली यावेळी गोंडपिपरी चे ठाणेदार संदीप धोबे, पोलीस हवालदार अनिल चव्हाण,प्रेम चव्हाण उपस्थित होते.
घरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर बलत्कार करणा-या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या नराधमावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आता समोर येत आहे.