विजप्रवाहाचा संपर्कात आल्याने बाप,लेकीचा मृत्यू ;राजूरा तालुक्यातील घटना

357

राजूरा

शेताला लागुन असलेल्या नाल्यातील पाणी आणण्यासाठी गेलेल्या बाप,लेकीचा विजप्रवाहाने घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दूदैवी घटना राजूरा तालुक्यात आज सकाळचा सूमारास घडली.स्नप्नील सत्यपाल चहारे ( वय 32 ),शेजीक स्वप्नील चहारे ( वय 6 ) अशी मृतकांची नावे आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजूरा तालूक्यात येणाऱ्या सिंधी येथिल शेतकरी स्वप्नील सत्यपाल चहारे हे आपल्या सहा वर्षिय मुलगी शेजीक स्वप्नील चहारे हीला सोबत घेऊन शेतात गेले. शेताला लागुनच नाला आहे. या नाल्यावर शेतातील सिंचनासाठी मोटारपंप बसविला होता.
नाल्यातील पाणी आणण्यासाठी स्वप्नील चहारे गेले.यावेळी सोबत मुलगी होती.मुलीने नाल्यातील पाण्यात पाय ठेवताच तिला विजप्रवाहाचा झटका बसला.तिला वाचविण्यासाठी वडीलांनी धाव घेतली.यात दोघांचाही विजप्रवाहाने दूदैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान पोलीस आणि महावितरणचे अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.पुढील तपास विरूर पोलीस करित आहेत.