हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या ;भिम कायद्या संघटनेची मागणी

583

मुंबई / दिगांबर साळवे ( विशेष प्रतिनिधी )

उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणातील दोषीना फासावर लटकविण्याची मागणी भिम कायदा या सामाजिक संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेने वरिष्ठ पोलीस निरिक्षक समता नगर,पोलीस ठाणे कांदिवली( पुर्व मुंबई ) यांना दिले आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे संतापजनक घटना घडली. हाथरस येथिल पिढीतेवर नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापली व हत्या केली. मात्र उत्तर प्रदेश सरकार सदर प्रकरण दडपण्याचा तयारीत असून गुन्हेगाराना पाठीशी घालत असल्याचा आरोप भिम कायदा सामाजिक संटनेने केला आहे. योगी सरकारचा या कृतीचे तीव्र निषेध करीत आरोपींना फाशी द्या अशी मागणी संघटनेने केली आहे.सोबतच उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे,अशी मागणी करणारे निवेदन भिम कायदा संघटनेने दिले आहे.

माजी आमदार पडा गडे नजर कैदेत

भीम कायदा सामाजिक संघटना प्रमुख माजी आमदार राम पडा गळे यांच्या नेतृत्वखाली राज भवन येथे हाथरस येथील पीडितेला न्याय मिळण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता . आज सकाळी पोलिस प्रशासनाने माजी आमदार राम पडा गडे त्यांच्या राहत्या घरी नजर कैद केले आहे.