राजुरात 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चे उद्घाटन

416

राजुरा

कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपजिल्हा रुग्नालय राजुराचे नवीन इमारतीत 50 खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले असून आज दिनांक आक्टोंबर पासून सेवेत सुरु झाले आहे या सेंटरचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते करण्यात आले अध्यक्ष म्हणून वैद्यकीय अधिकारी डाँक्टर लहू कुलमेथे होते तर याप्रसंगी या सेंटर चे प्रभारी डाँक्टर व्ही एम डाखोडे, डाँक्टर ए पी जाधव,डाँक्टर अनिता अरके ,डाँक्टर एस पी डाहूले,आयुष्य वैद्यकीय अधिकारी अमित चिदंमवार,डाँक्टर इर्शाद शेख,डाक्टर माया गायकवाड,डाँक्टर सुरेंद्र डुकरे,दंत चिकित्सक डाँक्टर आर ए यादव ,आरोग्य सहायक श्रीमती रिता राय आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते
या सेंटर मध्ये गंभीर कोविड रुग्णांना वैद्यकीय सेवा दिल्या जाणार आहे त्यामध्ये ज्या कोविड रुग्नाची आक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल अश्या रुग्णांना भरती करून त्यांना आक्सिजन लावून उपचार केला जाईल,म्हणूनच रुग्णची गरज लक्षात घेऊन उपजिहा रुग्नालयाचे नवीन इमारतीत हे सेंटर सुरु करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक लहू कुलमेथे यांनी दिली.