गडचिरोली आगारातील कामगारांना न्याय मिळण्यासाठी गडचिरोली आगार प्रमुखास घेराव

415

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

दिनांक ९/१०/२०२० रोजी शुक्रवार ला महाराष्ट्र एस टी कामगार सेना गडचिरोली विभागातील पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली आगारात भेट दिली.

एस टी कामगारांचे तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही असे तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र एस टी कामगार सेना विभागीय अध्यक्ष गडचिरोली श्री.राजगोपाल सुल्वावार यांना माहित होताच गडचिरोली आगार प्रमुखांना त्वरित घेराव घालून कामगारांचे वेतन या महिन्याच्या २० तारखे पर्यंत पूर्ण करा अन्यथा शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असे ठणकाऊन सांगण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक विलासजी कोडाप,शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख प्रा.ज्ञानेश्वर बगमारे,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजु कावळे,कामगार सेना विभागीय सचिव गजाननजी नागोसे,आगार सचिव शैलेश पिसे ,विनोद धकाते,महाजन, वाडेकर, भेडारे,घरात, श्रीवास,कन्नाके,वसाके,धोरुडे,वासमवार,कुरेशी, ठवसे,मेश्राम, येरमे,भटकर,अरगेलवार,किनेकर,धमगाये,रोडगे, बोरकर,गाजेवार,मडावी, अशा सर्व महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना चे पूर्ण सभासद उपस्थित होते.