गडचिरोली जिल्ह्यात नक्सल पोलिस चकमक – पाच नक्सल ठार ,3 महिलांचा समावेश

830

 

गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा

 

रविवार दिनांक 18/10/2020 ला दुपारी कोरची तहसील मधील धानोरा उपभिगातील ग्यारपत्ती पोलिस मदत केंद्र अंतर्गत येणाऱ्या कोसमी-किसनेली जंगल परिसरात पोलीस व नक्सल मध्ये भीषण कचकमक झाली.या चकमकीत 5 नक्सल मारले गेले, आणि त्यांचे पाचही मृतदेह पोलीसांचे हाती लागलेले आहेत. प्राप्त माहिती नुसार कोसमी-किसनेली परिसरात नक्सली असल्याची पोलीस दलाला सूचना मिळताच जिल्हा पोलीस दलातील c60 जवान नक्सल अभियान राबविले असता या दरम्यान आज चकमक उडाली.
या चकमकीमध्ये 5 नक्सली ठार झाले त्यामध्ये 2 पुरूष व 3 महिला यांचा समावेश आहे.चकमकी नंतर पोलिसांनी या परिसरात अभियान तिव्र केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाला नवनियुक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणी अप्पर पोलिस अधीक्षक मनिष कलवनिया यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश संपादन झाले आहे.