अलीकडच्या काळातील आरोग्य, सांप्रदायिकता व वाढता हिंसाचार ह्या आव्हानाइतकेच प्रसार माध्यमातून होणारे स्त्रीचे चित्रण हे अतिशय गंभीर आहे.
समाजात माणसाच्या गर्दीत हरविलेली मानसिकता शोधणारा शास्त्र आजच्या घडीला कमी पडत आहे, माणूस समाजात राहतो. त्याला नात्याचा गुंता आहे, लाल रंगाच्या रक्ताची जाण आहे. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणाऱ्या आपल्या जन्म दात्याच्या संस्काराची आन आहे, तरी व्यक्ती- व्यक्तीतील मानसिकतेचे आज तुकडे होवून पशुतुल्य वागणूक समाजात दिसत आहे, गाई बैलांच्या कळपात एकाच कुटुंबातील असतात पण त्यांना एवढं माहिती नसते आपण ज्यांच्यातून आपली उत्पत्ती झाली ती माझी माय आहे, ज्यांनी उत्पतीसाठी कर्म केला तो माझा बाप आहे, हे सगळ शास्त्र पशु पक्षाना माहिती नसते, त्यामुळे ढोरांच्या कळपात, शेळ्यांच्या कळपात कोण कोणावर आपला हक्क गाजवून आपली उत्पत्ती करतो आपली वासना क्षमवितो हे काही सांगता येत नाही, पण आपल्या मानवी दुनियेत लोक समाजात जगत असतांना नाते सबंध जात पात, वय वर्ष, मुलगी महिला यातील भेदभाव माहित असलेला आपला मानवी मेंदू, शास्त्रीय अभ्यासात असे म्हणतात कि जगाच्या पाठीवर जे खूप हुशार असणारे व्यक्ती फक्त ७% आपल्या बुद्धीचा वापर करतात. आपल्या मेंदूचा परिपूर्ण वापर करणारे आहेत जे जग विख्यात हुशार असतात, बाकी सगळे गुंत्यात असतात
एक महिन्या अगोदर मी एक बातमी ऐकली मन शुन्य झाल, डोळ्याच्या कडा लाल झाल्या, पापण्याची अपोपाच उघडझाप व्यायला लागली, डोक्यात विचाराचा चक्र सुरु झाल, ती बातमी होती, अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिला मारून टाकले, लहान अजाण मुलीशी समागम करणे किवा समागम करण्याचा प्रयत्न करणे. तेव्हा तो पशुतुल्य असतो, किवा त्याच वागण पशुलाही लाजवेल अस असतो, तेव्हा अस वाटायला लागल व्यक्ती हा व्यक्ती नसून हा राक्षस झालेला आहे, रक्षकाने भक्षक व्हावे मग दाद मागायला कुणाकडे जावे?
विश्वास कोणावर ठेवावे? हिंसक घटनाच्या आकडेवारीवरून गुन्ह्याची व्यापकता लक्षात येते, परंतू त्यांचा महिलांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि मानसिकतेवर किती भीषण परिणाम होतो याची मोजदाद करण्याचे मापक यंत्र मात्र उपलब्ध नाही.सद्याच्या काळात कोरोनाने थैमान घातले आहे, समाजातील प्रत्येक व्यक्तीची मानसिकता विस्कळीत झाली आहे, घराघरात वादविवाद, खाण्यापिण्याची टंचाई, आर्थिक बाजू इतकी कमकुवत झाली आहे कि, लोक हतबल झाले आहे, शिवाय शासनाने अनेक योजना काढल्या आहेत त्यांच्या नावातच समाधान आहे, रेशन वेळेवर न मिळणे, विधवा पेंशन योजना. श्रावणबाळ, अपंगासाठी संजयगांधी निराधार योजना, यांचे ४ – ४ महिन्याचे पैसे मिळाले नाही, यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मनस्थिती व्यवस्थित असेल काय? शिवाय ज्या घरचा कर्ता पुरुष असेल त्याला अस रोजंदारी मिळाली नाही, किवा उपजीविकेचा साधन नसेल तर त्या कर्त्या व्यक्तीची अवस्था अतिशय दैनीय आहे, अशा वेळी अनेक विकृत्या जाग्या होतात, घरात रोजचे भांडण, कीटकीट, वाईट व्यसन, अशा अनेक विकृतीमुळे व्यक्ती संस्कृती विसरतो, जो पुढ विचार येईल त्याचा व्यक्ती गुलाम बनतो, संस्कृती नावाची सुस्वभावी मुलगी जाऊन विकृती नावाची मुलगी पुढे येते. एकीकडे महिलांना कामासाठी अनुकूल परिस्थिती असावी म्हणून त्यांना कायद्यांत तरतुदी केल्या जातात, तर ह्याच तरतुदींमुळे मालकवर्ग त्यांना कामावर घेण्यास नाखूष असतो.
माणूस विकृतीचा गुलाम बनला कि, मग त्याला फक्त दिसतो वासना. वासना हि देखील विकृतीची बहिण आहे, समाजात बलात्कार, मारामारी, वैयक्तिक तणाव वाढून व्यक्ती मानसिक विकृत बनतो.सद्या लोंकडॉऊनच्या काळात मी पाहिलेली एक अशी केस होती जेमतेम ३५ वर्षाची महिला.अतिशय कष्टाळू, गावात छान ओळख आहे, ती कमी बोलते पण फार कष्टाळू आहे, अतिशय प्रामाणिक आहे, असे लोक म्हणायचे, आपल्या मेहनतीने छोटस घर उभं केल, आपली रोजी रोटी करून आपला प्रपंच चालवीत होती, २ छोटे छोटे गोंडस मुल आणि २ पती पत्नी असा ४ लोकांचा कुटुंब होता, रोज नवरा दारू पिवून यायचा नको त्या शब्दात अवहेलनात्मक बोलण. मारपीट करणे, छळणे, संशय घेणे, असे अनेक प्रकारे तिचा छळ चालला होता, वडिलाचा महारौद्र उग्र रूप पाहून मुल घाबरून भितीन सैरावैरा होत होती. ती महिला गेल्या मे २०२० पासून नवऱ्याच्या जाचामुळे स्वतःला मानसिक बनवून घेतल, कित्येक दिवस केसाला कंगवा लावला नव्हता. वाटल तर जेवण अध्ये मध्ये कधीतरी करत होती. अगदी खाटेला खिळून गेली होती, ती आपल्या नवऱ्याच्या सुधारित प्रगतीची वाट पाहत होती, पण तिची अपेक्षा नेहमी अनपेक्षा होत होती, ती खंगत जात होती, अगदी होती नव्हती तिच्यातील सहन करण्याची क्षमता संपुष्टात आली होती, अशातच मला माहिती झाल मी माझ्या काही सहकार्याला घेऊन तिची भेट घेतली असता तिच्यात बोलण्याची अशी क्षमता नव्हती, ती खाटेवर रात्र दिवस झोपून राहत होती, मी गेली तेव्हा मोठ्या कष्टाने उभी उठली. मी माझ्या कौशल्याचा आधार घेऊन तिला बोलकी करण्याचा प्रयत्न केल, तिला बोलकी व्हायला बराच कालवधी लागला, नंतर ती बोलकी होवून मोकळी हसून आपल्यावर होत असलेली बोलण्यातून. वागण्यातून. मारण्यातून हिंसा मोकळीपणे बोलू लागली, आपल सगळ सांगितली, आपल्या तिच्या आणि माझ्या भेटी दोनदा झाल्या आहेत, त्यात मार्गदर्शन करून थोडं जवळीकता साधण्यात आली, आज ती मोकळी होवून थोडी मोकळी वागतोय आहे, अशी अनेक उदाहरण आहेत कि खास करून महिलांच्या वाट्याला येऊन उपेक्षित जगावं लागते, नवरा म्हणून आपली इज्जत काढत नाही, बदनामी होऊ नये म्हणून खूप सहन करत शिकस्तीने जगाव लागतोय महिलांना. महिला स्वता:ला दोष देवून स्वत:ची कुचंबना करतात, पण पुरुष नावाची व्यक्ती कधी सुधारेल याचाच फार मोठा वेध लागलेला आहे, संसार दोघा नवरा बायकोचा असतो. संसाराची वाढती वेल म्हणून मुलाकडे बघितल जातो म्हणजे समजून जायचं एका घरात जेमतेम ४ लोक असतात. तरीही एकाच रक्ताचे असून वागण,वावरण आचार विचाराची श्रुखालाच जुडत नाही कुटुंबात, मग दुसऱ्या लोकांच काय? ते कसे विचार करत असतील? शिवाजी महाराजांचा काळ आठवला इतिहास वाचला तर राजे शहाजी महाराज आणि जिजाबाई आपल्या डोळ्यापुढ येतात, राजे शहाजी महाराज जिजाबाईना सांगतात, “आता तुम्ही शहाजी राज्यांच्या पत्नीच राहिल्या नाहीत, तुम्ही राजमाता झाल्यात, तुम्हाला शिवबाला वाढविताना अनेक भूमिका जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत, शिक्षिका, राजमाता, आई, असे बोलून शहाजी राजे कर्नाटकाच्या स्वारीवर निघाले तेव्हा शिवाजीचा वय अवघा ८ वर्षाचा होता. जेव्हा परत आले तेव्हा शिवाजी ९ वर्षाचे झाले, केवढा मोठा विश्वास आपल्या शहाजी राज्यांचा आपल्या सहचरणी/आपल्या अर्धांगीनीवर, तिच्या कर्तुत्वावर, त्या जिजामातेवर, आपण शिवाजी महाराज्यांच्या राज्यात राहतो, आपणही आपल्या पत्नीवर विश्वास ठेवायला शिकलेत तर संसार सोन्यासारखा मौल्यवान होईल. विचार – विचारला जुळून मोठ्ठी साखळी तयार होईल, फक्त जीवन जगताना विश्वास अट्टळ असण महत्वाचे आहे, आपला आपल्यावर विश्वास अट्टळ असला तर आपल्या मध्ये कोणत्याही वासनेचा,विकृतीचा आणि हिंसा या तिन्हीचा संचार आपल्यात होणार नाही, आपल्यात असलेल्या एकाग्र मानसिकतेच्या चिंद्या होवून विकृती उदयाला येणार नाही, म्हणून जगताना संयम आणि अंकुश अतिशय आवश्यक असतो, तेव्हाच आपल्या जीवनावर ताबा मिळवून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन प्रत्येक क्षण महोत्सव करू शकतो,परंतु स्त्रियांसाठी कुटुंब हे एकीकडे तिला सुरक्षा देणारे आणि तीची काळजी घेणारे स्थान आहे,तर दुसरीकडे तिला सहन कराव्या लागणाऱ्या ताणतणावांचे आणि दडपणाचेही केन्द्र आहे.
शब्दांकन आणि संकलन
संगीता तुमडे , आरोग्य संस्था कुरखेडा