एटापल्ली तालुक्यातील आधारभूत धानखरेदी केन्द्र सुरू करण्यासाठी मा जिल्हाधिकारी यांना रा कांँ पार्टी एटापल्ली तर्फे निवेदन…

342

प्रीती उज्वल देवनाथ:-

सध्या तालुक्यात धान कापनीचा हंगाम संपत आला असून धानमळनिचा हंगाम जवळ येत आहे. मात्र आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत काहीच हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाकडुन कवडीमोल भावाने धान खरेदी करण्याची भिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी शासनाने धानास प्रती क्विंटल 1815/-रुपये भाव व 700/-रुपये बोनस मिळुन 2515/-रुपये आधारभूत भाव दिला होता धानखरेदी लवकर सुरू झाल्यास व्यापारी वर्गाला गैरफायदा घेता येणार नाही. व्यापारी प्रतिक्विंटल 1000ते1200/-रुपये देतात म्हणजे जवळपास शेतकरी बांधवांना मिळणाऱ्या अर्ध्या रकमेची लुट करतात…

मागिल वर्षी बारदानाचा तुटवडा निर्माण झाल्याने धानखरेदी प्रभावित झाली होती,काही शेतकरी बांधवांनी स्वतःचा बारदाना महामंडळास दिला होता तो अजूनही परत मिळाला नाही त्याची प्रती बारदाना 30/-रुपये भरपाई देण्यात यावी
ज्या शेतकर्‍यांकडे बारदाना नव्हता त्यांनी नाईलाजाने व्यापारी वर्गाला धान 10ते12/-रुपये प्रमाणे आपला धान विकला ,शेतकर्‍यांना
शासनाच्या आधारभूत योजनेचा लाभ घेता आला नाही यावर्षी असे घडू नये, शेतकर्‍यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून शेवटपर्यंत बारदाना उपलब्ध करून देण्यात यावा,
मागिल वर्षी गोदाम अभावी देखील धान खरेदी प्रभावित झाली होती, शेवटी गावकर्‍यांनी गोटुलभवन, समाजमंदिर धानसाठवनुकिकरिता उपलब्ध करून दिले होते म्हणून लवकर आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे ,बारदाना व गोदामाची व्यवस्था करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली कडुन मा जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे मा तहसिलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी दौलतभाऊ दहागावकर तालुकाध्यक्ष रा कांँ पार्टी एटापल्ली, प्रशांत कोकुलवार ओबीसी फ्रंटल तालुकाध्यक्ष, लक्षणजी नरोटे रा कांँ पार्टी तालुका सचीव , प्रसादजी राजकोंडावार, संभाजी हिचामी आदिवासी फ्रंटल तालुकाध्यक्ष, राजु नरोटे सरपंच जांभिया, लालसुजी गावडे तसेच इतर कार्यकर्ते हजर होते.