घुग्घुस भाजपाच्या वतीने हंसराजभैय्या अहीर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

436
  1. घुग्घुस:- घुग्घुस येथील गांधी चौकात मा. खा. हंसराजभैय्या अहीर शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे कैवारी ओबीसी, भटक्या विमुक्तांचे नेतृत्व जनप्रीय लोकसेवक व पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस भाजपच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

वाढदिवसाचे औचित्य साधून चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे यांच्या हस्ते आरोग्यवर्धक दुधाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे म्हणाले मा. हंसराजभैय्या अहीर हे जनसामान्यांचे कैवारी आहे. चंद्रपूरचा आवाज लोकसभेत बुलंद करनारे आहे. घुग्घुस भाजपाच्या वतीने कोरोना काळात गोरगरिबांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आरोग्यवर्धक दुधाचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा प्रश्नासाठी लढा, शेतीला १० लाखांचा भाव, विकासाचा द्रुष्टीकोण, वेकोलीचे प्रश्न घेऊन थेट पंतप्रधाना पर्यंत पोहचविने, सिकलसेल रुग्णांसाठी रुग्णालय उघडने, गोरगरीबांचा आवाज संसदेत उठविने असे जनसेवेचे महान कार्य त्यांनी केले आहे त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी उत्तर भारतीय आघाडीचे प्रदेश सचिव संजय तिवारी यांनी मा. हंसराज भैया अहिर यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात मोठ्या संखेत नागरिकांनी आरोग्य वर्धक दुधाचा लाभ घेतला.
यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, उत्तरभारतीय आघाडी प्रदेश सचिव संजय तिवारी, महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, पंस उपसभापती निरिक्षण तांड्रा माजी सरपंच संतोष नुने, साजन गोहने, वैशाली ढवस, सामाजिक कार्यकर्त्या सुनिता पाटिल, तंमुस अध्यक्ष हसन शेख वाहतूक आघाडी उपाध्यक्ष विनोद चौधरी, भाजपा नेते निरंजन डंभारे, वेंकटेश तोटा, सुधाकर चन्ना, शंकर सिद्दम, अजय आमटे, सुनिल राम, श्याम आगदारी, मल्लेश बल्ला,स्वामी जंगम, सुरेंद्र जोगी, गुड्डू तिवारी, श्रिनिवास कोत्तुर, प्रविण सोदारी, इम्तियाज रज्जाक, मंगेश पचारे, पांडुरंग थेरे, तुलसीदास ढवस, मधुकर धांडे, विनोद जिंजर्ला, पत्रकार हनिफ मोहम्मंद, संजय पडवेकर उपस्थित होते.