गोंडपिपरीत ०३ लाख ४६ हजारांचा दारूसाठा जप्त…दोघांना अटक एक फरार

1150

गोंडपिपरी(प्रमोद दुर्गे ) : पोलिसांनी दि.(१३) शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून ३ लाख ४६ हजारांचा दारू सह मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. चंद्रपूर वरून मुलं वढोली मार्गे दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारावर विठ्ठलवाडा परिसरात चार चाकी वाहन एम एच १२ एम बी ३२७१ ला थांबवून तपासणी केली.यावेळी ९०० नग देशी व चारचाकी वाहन .असा ऐकून तिनं लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आकाश माहरूपवार अंचलेशवर वार्ड चंद्रपूर.वैभव निकोडे केळझर यांना अटक करण्यात आली आहे.सदर कारवाई ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी शंकर मंने,काकडे,कोंडेकर यांनी केली