ती भागविते मुक्या प्राण्यांची भूक….

882

बल्लारपूर:-

जगात सर्वत्र कोरोनाचे संकट आले असतांना अनेकांच्या पोटाला ताळे लागले आहेत. इथल्या अनेक लोकांना दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा वांदे आले होते. अनेकांच्या पुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण समाजातील गोर-गरिबांची पोटाची मिटविण्यासाठी अनेक हात पुढे आले आणि माणसांच्या पोटाची भूक मिटली. पण मुक्या प्राण्यांचं काय? अनेकांनी माणसांची भूक तर मिटविली पण तिने प्राण्यांची भूक ओळखली आणि ती आली प्राण्यांची भूक मिटविण्यासाठी. अश्या या समाजसेवी, प्राणीमित्र महिला आहे बल्लारपूर येथील श्रुती लोणारे.


श्रुतीला प्राण्यांची काळजी घ्यायची सवय होती. ति सध्या राहत असलेल्या आंबेडकर चौकात भुकेने तडफडत असलेल्या प्राण्यांची अवस्था पाहून तिला राहाविले नाही. त्यानंतर एक उपक्रम सुरू केला, तो म्हणजे स्वतः घरी अन्न शिजवून ती भुकेल्या प्राण्यांना देऊ लागली.
तिच्या या उपक्रमाची दखल समाजातील अनेकांनी घेतली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या पर्यत श्रुतीच्या उपक्रमाची माहिती गेली. त्यांनी बल्लारपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना फोन करून आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन सुद्धा केले.
बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा आणि नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी श्रुतीची भेट घेऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मदतीने आश्वासन दिले….