वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार

719

 

राखीव वन कक्ष क्रमांक १५०, नियत क्षेत्र गोजोली अंतर्गत येणाऱ्या वनांमध्ये गुराखी, गुरे चारीत असतांना अचानक झालेल्या वाघाच्या हल्यात श्री देवकुमार विश्वनाथ मोहूर्ले रा.गोजोली ता.गोंडपीपरी जि.चंद्रपूर यांच्या मालकीची तीन वर्ष वय असलेली कालवड(गाय) ठार झाली.
या घटनेची माहिती गुराखी श्री दादाजी मंगरू कोवे रा.दुबारपेठ याने गाय मालकास दिली,त्यानंतर गुरांच्या मालकाने वनाधिकारी याना संपर्क करून घडलेला प्रकार सांगितल्या नंतर लगेच काही वेळातच वनविभागाचे अधिकारी श्री.पी.पी.ढाले (वनक्षेत्र सहायक गोंडपीपरी) व श्री.एस.एस.नैताम (वनरक्षक गोजोली) यांनी घटनास्थळ गाठून सदर प्रकरणाचा मोकापंचनामा केला,परंतु काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली ती अशी की,मेलेल्या कालवडीचा(गाईचा)मोबदला लवकरच मिळावा व वाजवी किंमत मिळावी,अशी मागणी रेटून धरण्यात आली.
आता मनुष्य व वन्यजीव संघर्ष पुन्हा पेटतो काय?असे चित्र समोर आले खरे परंतु चौकशी अधिकाऱ्यांनी शासकीय निकषाच्या अधीन राहून,लवकरात लवकर मोबदला मिळवून देऊ असे आश्वासन देत उद्भवलेल्या परिस्थितीवर काही वेळ चर्चा करून परीस्थितीवर नियंत्रण मिळवून, सदर घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावले त्यानंतर हिंस्त्र प्राण्यांचे,वाघाचे, जंगलात वावर असल्याने कुणीही जंगलात प्रवेश करू नये अशा सूचना दिल्या व सर्व परिसरातील गस्त वाढविण्यात आली.