पंचायत समिती जिवती येथे स्व इंदिरा गांधी यांना अभिवादन

492

 

राजुरा (ता.प्र) :– आज दिनांक १९/११/२०२० रोज गुरूवारला पंचायत समिती जिवती येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न प्रियदर्शिनी श्रीमंती इंदिराजी गांधी यांना आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादन करण्यात आले. सर्वांनी एकतेची शपथ घेतली. यानंतर पंचायत समिती जिवती येथे आढावा बैठक घेण्यात आली.

या प्रसंगी पंचायत समिती सभापती अंजनाताई पवार, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी गणपतराव आडे, आदिवासी जेष्ट नेते श्री शामरावपाटील कोटनाके, श्री सुग्रीव गोतावळे माजी प स सदस्य, श्री अशफाक शेख उपनगराध्यक्ष, दत्ता तोगरे, भिमराव पवार, शंकरराव कांबळे, आरिफ भाई, रामु चव्हाण, रोहिदास आडे, साहेबराव नाईक, विलास पवार, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.