चंद्रपूर 19 नोव्हेंबर
मागील २४ तासात जिल्ह्यात २५३ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर एकही करोनाबाधीताचा मृत्यू न झाल्याने ११ दिवसांपासूनची करोनामृत्यू श्रृंखला तुटल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र यासोबतच २२२ नवीन करोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार १७३ वर पोहोचली आहे. सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १५ हजार ७३६ झाली आहे. सध्या २ हजार १६० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३३ हजार ७१८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १३ हजार ३१५ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २७७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २५७ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११ , यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.