बापरे! ती सांगते ४ मिनिट २३ सेकंद मध्ये १९५ देशाची नावे आणि राजधानीचे नाव…

818

दुबई : इंटरनेट आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सध्याच्या काळात मुलं अधिकाधिक हुशार बनत आहेत. त्याचे उदाहरण दुबईतील ही अवघी पाच वर्षांची मुलगी आहे. ती 4 मिनिटे आणि 23 सेकंदांमध्येच 195 देशांची व त्यांच्या राजधानींची नावे सांगते.

मूळची गुडगावची असलेली ही भारतीय वंशाची मुलगी आता आपल्या या कुशाग्र बुद्धीने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिने आता गिनिज बुकमध्ये आपल्या नावाची नोंद व्हावी यासाठी अर्ज दिला आहे. यापूर्वीच प्रानवी गुप्ता नावाच्या या मुलीच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली आहे. तिचे वडील प्रमोद गुप्ता यांनी सांगितले की यापूर्वी तिला सर्व नावे सांगण्यास 45 मिनिटे लागत असत.

कालांतराने अकरा मिनिटांत ती सर्व देशांची व राजधान्यांची नावे सांगू लागली. आता ती अवघ्या 4 मिनिट व 23 सेकंदांमध्ये सर्व नावे सांगते. प्रानवीने टी.व्ही.वर आठ वर्षांच्या मुलीला अमेरिकेचे सर्व 50 राज्ये व त्यांच्या राजधान्यांची नावे सांगत असताना पाहिले होते. त्यानंतर तिने जगातील देश व त्यांच्या राजधान्या लक्षात ठेवून सांगण्याचा सराव सुरू केला.