कोरोनाचे संकट गंभीर…आ.सुधीरभाऊ खंबीर

469

 

चंद्रपूर जिल्ह्यातील मंदिरे खुली झाली आहेत,भाविकांना आपल्या लाडक्या दैवतांचे दर्शन घेतांना आरोग्याची ही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. भक्तांच्या आरोग्याची जपणूक व्हावी याकरिता चंद्रपूर जिल्हावासीयांचे आदरणीय भाऊ अर्थात *मा.आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तत्परता दाखवली,खुल्या झालेल्या मंदिरात त्यांनी सॅनिटाईजर मशिन्स उपलब्ध करून दिल्या,कोरोनाच्या गंभीर संकटात भाऊंनी सेवाकार्य रुपी जो खंबीरपणा,जागृतपणा दाखवला त्याचा परिचय आजही पुन्हा दिसून आला…

मा.आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या सौजन्याने चंद्रपुरातील गजानन महाराज मंदिर आणि साईबाबा मंदिरात सॅनिटायझर मशीन लावण्यात आले .
या लोकार्पण सोहळ्यात भाजपा समन्वय आघाडीच्या प्रदेश सदस्य पूर्व विदर्भ सहसंयोजक शिल्पाताई देशकर यांच्या हस्ते सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले .
यावेळी भाजयुमोचे महामंत्री प्रज्वलंत कडू , वर्षा गटलेवार, संध्या वासाड, यश बांगडे, कुणाल गुंडावार, श्रीकांत येलपुलवार, विवेक शेंडे उपस्थित होते.