८३ वर्षाच्या आजीने हिंमत करून २८ वर्षाच्या चोराला झोडपले…

551

लंडन:-

संकटाचा सामना करण्यासाठी शरीरापेक्षाही अधिक बळ लागते ते मनाचे. धाडस व प्रसंगावधान असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकतो. ब्रिटन मधील ८३ वर्षांच्या जून टर्नर यांनीही हेच करून दाखवले आहे. त्यांनी आपल्या स्टोअरमध्ये चोरीसाठी घुसलेल्या २८ वर्षांच्या चोरास हातातील काठीने बदडून काढले व पोलिसांच्या स्वाधीन केले. आता या शौर्याबद्दल त्यांना ‘एम्प्लीफॉन अ‍ॅवॉर्ड फॉर बिटन्स’ हा पूरस्कार मिळाला आहे.

टर्नर या गेल्या 45 वर्षांपासून हेनले प्रांतातील एक स्टोअर चालवत आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांच्या या स्टोअरमध्ये एक चोर घुसला. त्याचा उद्देश लक्षात येताच टर्नर यांनी ‘हा माझा मेहनतीचा पैसा आहे, तू घेऊन जाऊ शकत नाहीस’ असे म्हणत हातातील काठीने त्याला मारण्यास सुरुवात केली.