रिक्षाचालकाला लघुशंका करतांना रोखणे सुरक्षारक्षकाला पडले महागात…

492

पिंपरी-चिंचवड येथे एका सुरक्षारक्षकाला रिक्षाचालकास बीएमडब्ल्यू गाडीवर लघुशंका करताना रोखणे महागात पडले आहे. या रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी पोलिसांनी या रिक्षाचालकास अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू कदम हा रिक्षाचालक येथील एका खासगी कंपनीच्या संचालकांच्या बीएमडब्ल्यू गाडीवर लघुशंका करत असल्याचे त्यावेळी तिथे कर्तव्य बजावत असलेले शंकर वाईकर या सुरक्षारक्षकाला दिसले. त्यावेळी सुरक्षारक्षकाने रिक्षावाल्याला लघुशंका करतांना रोखले. यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे बाळू कदम याने शंकर वाईकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून वाईकर यांना पेटवून देत तेथून पळ काढला.

शरीराला आग लागल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी वाइकर यांनी नजीकच्या नाल्यात उडी घेतली. सध्या वाईकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून वरील सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.