नायब तहसीलदार राजेश गुरव ने दिवाळीला गाव घेतले दत्तक

482

संघपाल गवारगुरु:-तालुका प्रतिनिधी तेल्हारा

आज दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर तेल्हाऱ्याचे संजय गांधी निराधार योजनेचे नुकताच पदभार सांभाळणारे नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी तेल्हारा तालुक्यातील आदिवासी पुनर्वसित उमरशेवडी व तलाई गावाला भेट देऊन अडचणी जाणून घेण्यासाठी गेले असता असे लक्षात आले की देशात एकीकडे दिवाळी धूमधडाक्यात साजरी होत असताना दुसरीकडे आदिवासी भागात मात्र लोकांना दिवाळी बाबत माहिती सुद्धा नाही.त्यामुळे राजेश गुरव आणि संतोषकुमार खवले पत्रकार सय्यद अहमद प्रा.प्रवीण बोंद्रे,सरपंच आमद सुरात्ने,नंदाताई ठाकरे,पोलिस पाटील हातम सुरात्ने तलाठी देशमुख सामाजिक कार्यकर्ता उमरभाई बाजिद खाँ सुरता डावर इसराइल खाँ यांनी उमरशेवडी व तलाई गावातील लोकांसोबत दिवाळी साजरी केली.

या पंचविस कुटुंबाचा गांव आहे तरीही मूलभूत सुविधा नसल्यामुळे आदिवासी समाज बांधव अंधारात जीवन जगतात तेव्हा नायब तहसिलदार राजेश गुरव यांनी आपल्या घरून फराळ आणून संपूर्ण गावात वाटप केले आणि अकोट न पा चे शिक्षण सभापती मो खालिदजमा यांच्याकडून पूर्ण गाँवक-यांना मास्क वाटप करण्यात आले व वृक्षारोपण सुध्दा करण्यात आले त्यानंतर लोकांचा अडचणी जाणून घेऊन त्यांना संजय गांधी निराधार योजना राशन कार्ड आधार कार्ड व शासनाचे शासकीय योजना बाबत माहिती दिली राजेश गुरव यांनी पदभार सांभाळताच सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग असून एक कामाची शैली पार पाडण्यास खरी भूमिका बजावत असते.

तसेच उमरशेवडी व तलाई हे गावात विज पाणी शाळा शेत रस्ते सुध्दा नाही व मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने ही बाब पाहुन नायब तहसीलदार राजेश गुरव आणि शिव छत्रपती साम्राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संतोष खवले ,पत्रकार सय्यद अहमद प्रा.प्रवीण बोंद्रे यांनी फराळ देऊन त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करून गावाच्या विकासासाठी गाँव दत्तक घेऊन गावाचा शैक्षणिक,सामाजिक,बौध्दीक विकास करून त्यांना प्रवाहात आणण्याची शपथ घेतली
नायब तहसीलदार राजेश गुरव एड संतोष खवले पत्रकार सय्यद अहमद प्रा प्रवीण बोन्द्रे यांचे गाँवक-यांनी विशेष आभार मानले.