बिबट्याच्या हल्ल्यात तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू…

620

 

बीड : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ही सायंकाळी उघड़कीस आली. नागनाथ गहिनिनाथ गर्जे वय ४० वर्षे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जे हे गावाजवळच्या वाघदरा या शेतात तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना बिबट्याने अचानकपणे नागनाथ गहिनीनाथ गर्जे त्यांच्यावर हल्ला चढवला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून गेलेले नागनाथ गर्जे सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन पाहणी केली असता, नागनाथ गर्जे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दरम्यान त्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला होता.

बिबट्याने हल्ला करून, नागनाथ गर्जे यांचा चेहरा आणि मान खाल्ली होती. त्याचबरोबर सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. मयत हे आष्टी पंचायत समितीच्या मोराळा गनाच्या पंचायत समिती सदस्या आशा गर्जे यांचे पती आहेत.