दानापूर येथे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

818

संगपाल गवारगुरू

जिल्हा प्रतिनिधी अकोला

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या कोल्हापूर येथील ऋषिकेश जोंधळे, आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाळा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. ऐन दिवाळीच्या दिवशी 20 आणि 28 वर्षाचे असलेले हे
सुपुत्र शहीद झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय येथे शंभू सरकार मित्र मंडळ व समस्त गावकऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात डॉ.अजय विखे , श्रीकांत खोने, अॅड. अजितसिंह सेंगर, आर्मी जवान मंगेश हागे यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र पोलीस सागर गिरी, सागर खोने, रामेश्वर भगत,शुभम गिरी पो.पा. संतोष माकोडे, पं.स.स संदीप पालीवाल, प्रेमकुमार गोयनका, पत्रकार रवी वाकोडे,रवींद्र ढाकरे, विजय दांदळे व शंभू सरकार मित्र मंडळाचे शुभम थोटे, पंकज सावळे, मनोज वाकोडे,पवन विखे, विनायक कतोरे,अभिजीत पाटील,विपुल कुऱ्हाडे, गजानन वानखडे, गणेश ठोकळ, सचिन भुते, कुणाल उन्हाळे, गौरव मेसरे, शुभम बावणे, अजय विरघट, करण ठाकुर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुनील धुरडे तर आभार प्रदर्शन गोपाल विरघट यांनी मानले.