संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला
वर्हाडी साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद
देशाच्या स्वातंत्र आंदोलनात जसा विदर्भाने सहभाग दिला तसाच सहभाग परिवर्तनात वर्हाड चा असुन वर्हाडी साहित्यात समाज परिवर्तनाची ताकद असल्याचे प्रतिपादन सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनी केले .
संत गजानन महाराज विहीर संस्थान शांतीवन अमृततिर्थ पोपटखेड येथे फेसबुक वर्हाडी कट्टा च्या चौथ्या स्नेहमिलन सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक मानकर सर होते तर उदघाटक सत्यपाल महाराज होते प्रमुख पाहुणे दैनिक अजिंक्य भारत चे संपादक पुरुषोत्तमजी अवारे पाटील ,विनय दांदळे,विजय इंगळे, नरेंद्र इंगळे, किशोर बळी, भास्करराव अरबट,आबासाहेब कडु,प्रशांत मोरे, सदाशिव शेळके, किशोर मुघुल,आणी विनायक राव मोडशे होते.
कार्यक्रमामध्ये अनिल इंगळे यांच्या नाणे संग्रहाची आणी अनिल काळे यांच्या चित्रांची प्रदर्शनी करण्यात आली होती.मान्यवरांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.पुस्तकांचे आणी काव्य संग्रहांचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमात स्नेह भोजन आणि लेकीबाईंना साळी चोळी देण्यात आली कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रशेखर महाजन यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश कुकडे यांनी केले या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन फेसबुक वर्हाडी कट्टा तेल्हारा तालुका आणी अकोट तालुका यांनी केले होते.