यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर प्राथमिक शिक्षक समितीचे निदर्शने

350

सतीश बाळबुधे/यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ : कोविड परिस्थितीमुळे मोर्चाला परवानगी न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या जिल्हा शाखेच्या वतीने आज देशव्यापी संपाचे निमित्ताने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून शासनाच्या शिक्षक कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करून असंतोष व्यक्त केला व जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.
अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे, खाजगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करणे, मुदतपूर्व सेवानिवृत्ती जाचक धोरण रद्द करणे, कामगार कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावणारे नवीन कामगार कायदे रद्द करणे, केंद्रीय कर्मचाऱ्यांना ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे, अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करणे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या विनाअट करणे, जिल्हा परिषद कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवणे, वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा दुसरा खंड तात्काळ जाहीर करणे, दरमहा साडेसात हजार रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करणे व प्रत्येक गरीब व्यक्तीला दहा किलो धान्य पुरवठा करणे यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी आज देशव्यापी संप करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे सरचिटणीस गजानन देऊळकर ,महिला आघाडी प्रमुख सौ सुनीता जतकर,जिल्हा नेते देवेंद्र चांदेकर, हरिदास कैकाडे, विलास गुल्हाने, मिलिंद देशपांडे, यांचेसह राधेश्याम चेले, रमेश बनपेलवार,मुकेश भोयर, विजय लांडे, विशाल ठोंबरे, मारोतराव काळेकर, आशण्णा गुंडावार, संदीप मोहाडे, पुंडलिक रेकलवार,विकास डंभारे, हरिहर बोके,अनिल उत्तरवार,संजय काळे दीपक वारेकर,भूमन्ना कसरेवार,यशवंत काळे,,टी एन शिंदे, राजू शिरभाते, विनोद शिरभाते,नरेंद्र भांडारकर,सुरेश वनवे,विनोद क्षीरसागर, अविनाश गोरे ,हिरालाल राठोड, शाम शेंडे,रणजित डेरे इत्यादी उपस्थित होते.