अहेरी-खमनचेरु रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात,अमोल गुडेल्लीवार यांच्या प्रयत्नांना यश

429

– नितेश खडसे जिल्हा प्रतिनिधी

भाजयुमो जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अहेरी शहरातील आणखी एक प्रलंबित काम मार्गी लागले.
अहेरी-खमनचेरु ह्या ७ किमी रस्ताची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ५ कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होहून,माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन होहूनही गेल्या १ वर्षांपासून सदर रस्ताच्या कामाला प्रत्येक्ष सुरुवात न झाल्याने ह्या रस्ताची प्रचंड दुरावस्था झाली होती,नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता,अनेकांनी ह्या बाबत तक्रार केल्यावर ह्याची तात्काळ दखल घेत भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अमोल गुडेल्लीवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार अहेरी श्री. ओंकार औताडी यांना एक निवेदन देऊन ह्या प्रलंबित रस्ताच्या कामाला तत्काळ सुरुवात करावे अन्यथा भाजपा युवा मोर्चा तर्फे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, सोबतच सोशल मीडियावर सातत्याने ह्या विषयांवर सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधले होते..!!
ह्यानंतर तब्बल १ वर्षानंतर संबंधित यंत्रणा जागी झाली असून, सदर रस्ताच्या दुरुस्तीच्या कामाला काल पासून सुरुवात करण्यात आले असून, सद्या सदर रस्तावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे, नगराळे कन्ट्रक्शन कंपनी, नागपुर यांची जुनी निविदा रद्द करण्यात आली असून, लवकरच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून अहेरी-खमनचेरु ह्या ७ किमी रस्त्यावर नवीन डांबरीकरणाचे काम केले जाणार असल्याची माहिती संबंधित अभियंता यांनी दिली आहे, अमोल गुडेल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अहेरी शहरातील आणकी एक समस्या लवकरच मार्गी लागणार आहे,नागरिकांनी ह्याबाबत समाधान व्यक्त केले आहे..!!