बोंड अळीने ८०% कपाशी नष्ट

485

संघपाल गवारगुरु
जिल्हा प्रतिनिधी अकोला

अकोला, ता.२८
बोंड आळी मुळे अकोला जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी नष्ट झाली असल्याचे अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्यशासन शेतकऱ्यांना या संकटात कोणती मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अतिवृष्टी असंतुलित वातावरणामुळे खरीप पिकांवर अज्ञात व रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. कापसासारखे एकमेव नगदी पीक बोंड अळी व बोंडळामुळे नष्ट होत आहे पश्चिम विदर्भातील कपाशी हे एकमेव नगदी पीक आहे यावर्षी बोंड आळी व बोंडसळ यामुळे कपाशी पीक सुद्धा नष्ट झाले आहे.
अकोला जिल्हा कृषी विभागाकडून ८० टक्के क्षेत्रावरील कपाशी पीक धोक्यात आल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे. कपाशीच्या पेरणीपासून प्रत्यक्ष उत्पादन घेईपर्यंत तो मोठ्या प्रमाणात खर्च येतो सर्व श्नुत आहे यावर्षी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना कापूस वेचणी चा प्रारंभ सुद्धा करता आला नाही इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.