आ.सुभाष धोटे यांनी चिंचोली (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्राला स्थानिक खनिज विकास निधी अंतर्गत उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका…

385

चिंचोली (बु.) प्राथमिक आरोग्य केंद्र ता. राजुरा पासून ३५किमी अंतरावर असून यामध्ये २२ गावाचा समावेश आहे. अति संवेदनशील परिसर असल्याने शासनाची १०८ ही रुग्णवाहक सेवा अपुरी पडत आहे. कार्यरत वाहन १०२ क्षतीग्रस्त असल्याने रुग्णाची हेळसाड होत होती. त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत कमेटी व सामाजिक कार्यकते तसेच गावकरी यांनी मा. आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे व स्थानीक आरोग्य जिल्हा प्रशासन यांचे कडे वारंवार रुग्णवाहिकेबाबत मागणी केली.
समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार श्री. सुभाषभाऊ धोटे साहेब यांनी मा.ना.पालकमंत्री विजयभाऊ वडेड्डीवार यांचे संकल्पनेतुन स्थानिक खनिज विकास निंधी अंतर्गत चिंचोली(बु.)प्राथमिक आरोग्य केंद्राला १०२ ची रुग्णवाहिका प्राप्त करून दिली.
त्या रुग्णवाहिकाचे लोकार्पण सोहळा संविधान दिनाचे औचीत्य साधून वैद्यकीय अधिकारी सोनकुसरे मॅडम, माजी सरपंच सौ. माधुरी नागापूरे. उपसरपंच श्री. मारोती न्याहारे व सामाजिक कार्यकर्ता श्री. अरुणभाऊ सोमलकर. संबाशिव नागापूरे श्री. सुभाष धनवलकर श्री. बंडूजी एकोणकर सुनील बोरकुटे चालक, श्री. अरुण भोंगळे श्री. गणेश चिंचोलकर श्री. मनोज दुर्योधन श्री. सुधाकर मोटधरे, तुषार खारकर श्री भीमराव खोब्रागडे, श्री राजकुमार ठाकूर, धनराज उपासे सौ.सुरेखा सोमलकर आशा वर्कर पी. एच.सी. स्टॉप व इतर गावकरी च्या उपस्थित पार पडला. याबाबत या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण सोमलकर, उपसरपंच श्री. मारोती न्याहारे, सरपंच सौ. माधुरी नागापुरे श्री. धनराज चिंचोलकर माजी सरपंच चिंचोली(बु.) व गावक-यांनी मा. आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे मनोचित आभार व्यक्त केले.