आनंदवन येथील डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या…

3160

आनंदवन(वरोरा):
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे यांनी आज आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. डॉ.शीतल आमटे यांनी विष प्राशन केल्यावर त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वी डॉ. शीतल आमटे या चर्चेत आल्या होत्या. त्यांनी २० नोव्हेंबर २०२० ला फेसबुक लाईव्ह करून महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामावर आणि विश्वस्तांवर काही आक्षेप घेतले होते. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.

परंतु डॉ.शितल आमटे यांचे आत्महत्या करण्यामागचे मूळ कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार स्वतःच विषारी इंजेक्शन टोचुन घेतल्याने मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकारी सूत्राने सांगितले आहे..

अधिक माहिती लवकरच…