अवैध टाँवर पाडा आंदोलनाला मिळाले यश; शिवसेना महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली केले होते आंदोलन

414

आज दिनांक १ डिसेंबर रोजी नेहरू नगर येथे एका घरावर अवैध रित्या टावर चे बांधकाम करण्यात आले होते. त्या बद्दल स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध असतांना सुद्धा कुठलीही परवानगी न घेता एका घर मालकाने नजीकच्या जागी बीएसएनएल चे टावर बांधकाम केलेले होते.
वारंवार तक्रारी देऊनही प्रशासन लक्ष देत नसतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या आदेशाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश बेलखेडे ,उपशहर प्रमुख सुरेश नायर, श्रीकांत करडभाजने,विजुभाऊ ठाकरे, कामगार सेनेचे चोबेजी, महिला आघाडीच्या विद्याताई ठाकरे,चोबेताई यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेहरू नगरच्या स्थानिक नागरीकांसोबत तिथेच त्या घरासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात आले.
या टाँवर मुळे भविष्यात होणाऱ्या आरोग्य विषयक समस्या,जीवीतहानी या बद्दल माहिती फोन वरून महानगर प्रमुख यांनी महानगर उपायुक्त यांना दिली असता या आंदोलनाची दखल घेत अतिक्रमण विभाकाचे अधिकारी व त्यांची संपुर्ण यंत्रणा येऊन ते बांधकाम थांबविण्यात आले व पुढील कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी स्थानिकांना दिली.