पोलीस मदत केंद्र रेगडी यांच्या हस्ते परिसरातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वितरित…

756

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

गडचिरोली:गडचिरोली पोलीस विभागातर्फे प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील जवळपास 28 ते 30 नागरिकांना जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम व मागासलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक आदिवासी गोरगरीब नागरिक सोयीसुविधा व पैशाअभावी आपले महत्वाचे कागदपत्र बनवू शकत नाही. म्हणूनच गडचिरोली पोलीस विभागातर्फे ही एक सुंदर अशी योजना राबवून विविध ठिकाणी ही योजना राबविण्यात येत असल्याचे सुंदर चित्र दिसत आहे.
चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावात वितरित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लाभार्थी सह पोलीस मदत केंद्र येथील प्रभारी अधीकारी श्री,श्रीकांत डांगे साहेब व पोउपनि प्रमोद सरोवर,पोलीस अहमलदार श्री सोपान कांबडे,श्री महेंद्र कुमरे,व मा.सरपंच बाजीराव गावडे,त.मू.स उअ श्री गुरुदेव कुळमेथे,समाजसेवक श्री,प्रशांतभाऊ शाहा व गावातील नागरिक,कर्मचारी उपस्थित होते.