मूलचेरा तालुक्यातील गीताली येथे धानाच्या पुंजनाला भीषण आग; शेतकऱ्याचे झाले लाखो रुपयांचे नुकसान

477

प्रतिनिधी/रुपाली रामटेके
गडचिरोली:
मूलचेरा तालुक्यातील गिताली या गावातील शेतकरी सुनील तारापत मंडल यांच्या शेतात काल सायंकाळी सुमारे सहा ते सात वाजताच्या सुमारास धानाच्या पुंजनाला भीषण आग लागली. त्यावेळी गावकरी शेताकडे धाव घेतले परंतु पाण्याची सुविधा नसल्याने आग विजवू शकले नाही.

त्यामुळे पूर्ण पुंजन आगीने खाक झाल्याने शेतकऱ्यांची 40 ते 45 क्विंटल धानाची नुकसान झाली आहे. ही आग कश्या मूळे लागली हे आता पर्यंत कळले नसून या घटनेमुळे शेतकरी कुटुंब दुखावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पटवारी व पोलीस कर्मचारी घटना स्थळ गाठून पुढील तपास करीत आहेत.