पातुर शहरातील विविध विकास काम करण्यात यावे यासाठी नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांची मागणी…

397

अतिशकुमार वानखडे(जिल्हा प्रतिनिधी)

अकोला:- स्थानिक स्वराज्य संस्था नियुक्त (विधानपरिषद) आमदार मा.गोपीकिशन बाजोरिया यांना पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे यांच्या शिष्ट मंडळाने भेट घेऊन पातुर शहरातील विविध विकास कामासंबधी त्यांच्या पत्राद्वारे मागण्या केल्या.
त्यामध्ये पातुर ते भंडारज शेतरस्ता खडीकरण व डांबरीकरण,अती प्राचिन असे श्री खडकेश्वर मंदिर येथे सुरक्षा सिमा भिंत आणि सभामंडप, शहरासाठी कार्डियो रूग्णवाहीका इत्यादी कामांसाठी त्यांच्या आमदार निधितून निधी उपलब्ध करण्यात यावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी पातुर नगरपरीषद बांधकाम सभापती सौ.तुळसाबाई गाडगे , युवा सेना शहर प्रमुख योगेश फुलारी, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश गाडगे , पातुर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकुर शिवकुमारसिंह बायस , राहुल अत्तरकार , रितेश सौंदळे गुरूजी व किरण कुमार निमकंडे आदी मान्यवर उपस्थीत होते.