मराठा सेवा संघ राजुराची कार्यकारिणी गठीत; दिनेश पारखी यांची अध्यक्षपदी फेरनिवड…

433

राजुरा- दि. 12 डिसेंबर 2020 ला बळीराजा नागरी सहकारी पत संस्था, राजुरा येथे झालेल्या आढावा बैठकीत चंद्रकांत भोयर यांची कार्याध्यक्ष व संदिप गणफाडे यांची उपाध्यक्ष मराठा सेवा संघ, राजुरा या पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच दिनेश पारखी यांची तालुकाध्यक्ष मसेस, राजुरा या पदावर फेरनिवड करण्यात आली. बाकी कार्यकारीणीची निवड तालुकास्तरीय बैठकीत करण्यात यावी असे ठरविण्यात आले.
या बैठकीचे अध्यक्षस्थानी दिपक खामनकर, जिल्हाध्यक्ष मसेस, चंद्रपूर तसेच विचारपीठावर दिपक जेऊरकर, महादेव ढुमणे, विजय मोरे, दिनेश पारखी, राजू भोयर हे उपस्थित होते.
दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष दिपक खामनकर यांच्या हस्ते शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. बैठकीत मराठा मार्गच्या “बळीराजा विशेषांक -२०२०” चे वितरण करण्यात आले. मराठा सेवा संघाची “शिवधर्म दिनदर्शिका २०२१” घराघरात पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड तर्फे आयोजित “राजमाता अहिल्याबाई होळकर” यांच्या जीवनावरील निबंधस्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीचे संचालन संभाजी साळवे यांनी केले. प्रास्ताविक दिनेश पारखी व आभार प्रदर्शन मधुकर डांगे यांनी केले.
या बैठकीला लक्ष्मण घुगुल, मधुकर मटाले, मधुकर बोबडे, सुभाष अडवे, सुरज भांबेरे, वैभव अडवे, अक्षय विधाते आणि नूतन पायपरे उपस्थित होते.