गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा-आमदार डॉ. देवरावजी होळी

434

नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव जिल्हा महिला व बाल या जिल्हा रुग्णालयात असंख्य पदे रिक्त असल्याने येथील रुग्णांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथील रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली आहे.रूग्णालयात एकूण 97 पदे मंजूर असताना केवळ 46 पदे भरण्यात आलेले असून त्यात लिपिकाची ९ पदे मंजूर असताना केवळ १ लिपिकाची भरती करण्यात आली आहे त्यामुळे त्या संपूर्ण रुग्णालयाचा कार्यालयीन कारभार एका लिपिकाच्या आधारावर चाललेला असून यामुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी असोत वा परिचारिका अशी 51 पदे रिक्त असल्याने रुग्णालयाचा कारभार करणे कठीण जात आहे. त्यामुळे सदर प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन या रुग्णालयातील पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी शासनाला केली आहे.