गडचिरोली जिल्हावर अन्याय होऊ देणार नाही-आमदार डॉ देवराव होळी

400

जिल्हा संपादक प्रशांत शाहा

मुंबई: आज मंत्रालय मुंबई येथे आदिवासी विकास विभागाच्या सचिव यांचे सोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी चर्चा केली. यांच्या पुढाकाराने आविसचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनात कंत्राटी संघटनेचे अध्यक्ष बाबुदास हलामी सदर चर्चेमध्ये उपस्थित होते

     गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले मानधन त्वरित देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी 17कोटी रुपये लवकरच मंजूर करीत असल्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.
सोबतच आदिवासी विकास विभागाचे विविध प्रलंबित समस्या आमदार डॉ होळी यांनी स्वतः मांडले व सर्व समस्या निकाली काढण्याची मागणी केली. बोलतांना सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यावर महाविकास आघाडी सरकार अन्याय करीत आहे. सदर अन्याय सहन करणार नाही, वेळ आल्यास सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी रस्त्यावर उतरू व लोकशाही चा मार्गाने आंदोलन करू व सरकारला जाब विचारू असा इशारा दिला.