शेखर बोंनगीरवार तालुका प्रतिनिधी
गोंडपिपरी: देशातल्या धनाढयांना फायदा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाने कृषी विधेयक आणले. शेतकरी बांधवाच्या जिवावर उठणारे हे काळे कायदे आहेत. या कायद्याविरूध्द देशभरातून बळीराजा एल्गार पूकारत आहे. यामुळे हे काळे कायदे तातडीने खारीज करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या किसान सभेचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष आकाश चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भात आज तहसिलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
केंद्र शासनाने कृषी क्षेत्राशी संबधित विधेयक मंजूर केले आहेत. हे विधेयक रद्द करावे या मागणीला घेत देशभरातील शेतकरी आता पेटून उठले आहेत. या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव आंदोलन करित असतांना सरकार मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी उत्सुक दिसत नाही. एवढेच नाही तर केंद्र सरकारमधील काही मंत्री आंदोलकांना पाकिस्तानी संबोधून शेतकरी बांधवांचा धडधडीत अपमान करित आहेत. देशातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक तातडीने मागे घ्यावे अशी मागणी गोंडपिपरी तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस च्या किसान सभेचे तालुकाध्यक्ष आकाश चौधरी यांनी केली आहे. आज यासंदर्भात सभेच्या शिष्टमंडळाने तहसिलदार के.डी.मेश्राम यांची भेट घेतली. त्याच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी राॅयुकाचे जयेश कारपेनवार,युवा कार्यकर्ता संतोष खोब्रागडे,किशोर चौधरी, मोरेश्वर खरबनकर यांची उपस्थिती होती.