शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे भव्य धरणे आंदोलन

420

वंचित बहुजन आघाडी* चे *राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर* यांनी शेतकरी आंदोलनाला *सक्रिय पाठींबा* दिलेला आहे. व बाळासाहेबांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी च्या वतीने *गुरूवार दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत* महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *धरणे आंदोलन* करण्यात येत आहे.

तेव्हा बाळासाहेबांच्या आदेशाचे पालन करत *वंचित बहुजन आघाडी नागपुर जिल्हा (शहर व ग्रामीण)* तर्फे *संविधान चौक, नागपूर* येथे मोठ्या स्वरूपाचे *धरणे आंदोलन* आयोजित करण्यात आलेले आहे. प्रसंगी पुर्व विदर्भ समन्वय समिति चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहनार आहेत. सोबतच नागपुर शहर कार्यकारिणी, ग्रामीण कार्यकारिणी, सर्व विधानसभा विभागीय कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी, महिला आघाडी, युवक आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहनार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती पक्षाचे *नागपुर शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे* व *नागपुर ग्रामीण अध्यक्ष विलास वाटकर* यांनी केलेली आहे.