वनरक्षक वनपाल संघटना नागपूरच्या आमसभेत विविध कार्यकारणी गठीत…

595

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली: महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटना, नागपूर यांची आमसभा वन विश्राम गृह,आल्लापल्ली येथे आयोजित करण्यात आली. सदर सभेत केंद्रीय पदाधिकारी श्री.इंद्रजित बारस्कर प्रदेश महासचिव,श्री.एम.गाजी पटेल केंद्रीय सल्लागार, श्री.राजेश पिंपळकर केंद्रीय पदाधिकारी, श्री.बाळूभाऊ मडावी केंद्रीय सदस्य,श्री.बाळापुरे साहेब वृत्तीय अध्यक्ष यांचे उपस्थितीत आमसभा पार पडली.
सदर सभेत केंद्रिय सचिव श्री.चंद्रशेखर तोम्बरलावार यांची वनपरिक्षेत्र या पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे सत्कार करण्यात आले. व त्यानंतर गडचिरोली वन वृत्ताची वृत्तीय कार्यकारीणी गठीत करण्यात आली. त्यात सर्व संमतीने श्री.नितेश कुमरे वृत्तीय अध्यक्ष, श्री.श्रीकांत भाऊ सेलोटे वृत्तीय कार्याध्यक्ष,श्री.शैलेश करोडकर सचिव,श्री.हरीश दहागावकर उपाध्यक्ष, सौ.रसिका मडावी महिला आघाडी प्रमुख यांची निवळ करण्यात आली.
तसेच केंद्रीय कार्यकारीणी चा कार्यकाळ संपल्याने केंद्रीय कार्यकारीणी करीता गडचिरोली वन वृत्तातून श्री.बाळूभाऊ मडावी आणि श्री.गाजी पटेल यांचे नावाची सर्वसंमतीने निवळ करण्यात आली.
तसेच आल्लापल्ली वन विभागाची नवीन विभागीय कार्यकारीणी गठीत करण्यात आली. विभागीय कार्यकारीणीत श्री.एस.पी.धानोरकर अध्यक्ष, श्री.अतुल कातलाम कार्याध्यक्ष, श्री.राजेंद्र घोरुडे सचिव, श्री.कवीश्वर भांडेकर उपाध्यक्ष, श्री.सचिन धात्रक उपाध्यक्ष, श्री.संतोष पडालवार सल्लागार, कु.नेहा मांदाडे महिला प्रतिनिधी, कु.निराशा मेश्राम महिला प्रतिनिधी, कु.हर्षा घरत महिला प्रतिनिधी, श्री.देवानंद कचलामी सहसचिव, श्री.समाधान चाथे,श्री.बी.डी. राठोड,श्री.चंद्रकांत सडमेक,श्री.बाला व श्री.एस.पवार संघटक यांची सर्वानुमते विभागीय कार्यकारीणी पदी निवळ करण्यात आली.