बल्लारपूर नगरपरिषद च्या वतीने आज स्वच्छ सर्वेक्षण २०२१ तथा वसुंधरा अभियान अंतर्गत सायकल फेरी…

380

विक्की दुपारे (बल्लारपूर प्रतिनिधी)

बल्लारपूर: बल्लारपूर नगरपरिषद च्या वतीने आज स्वच्छ सर्वेक्षण २०२१ तथा वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये लोकांना प्रदूषणापासून स्वतःचे शरीर कशा प्रकारे स्वस्थ ठेवण्यात येईल व येणाऱ्या पिढी करिता इंधनाचा बचत कशाप्रकारे करता येईल असा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्याचा आला.
बल्लारपूर नगरपालिकेने २०१९ मध्ये पूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त केला होता. तसेच या वर्षी सुद्धा ते या कार्यक्रमात सहभागी आहेत. याप्रसंगी बल्लारपूर नगरपरिषदचे नगराध्यक्ष हरिष शर्मा तसेच बल्लारपूर नगरपरिषद चे मुख्याधिकारी श्री विजय सरनाईक, बल्लारपूरचे उपमुख्य अधिकारी काटकर सर, उपमुख्य अधिकारी मोटघरे सर, संगीता उंबरे व संपूर्ण कर्मचारी व लोक मोठ्या संख्येत उपस्थित होते..