HomeBreaking Newsविजय वडेट्टीवार मंत्री यांच्या पुढाकाराने घुगूस नगर परिषदेची स्थापना...

विजय वडेट्टीवार मंत्री यांच्या पुढाकाराने घुगूस नगर परिषदेची स्थापना…

मुंबई/चंद्रपूर- दिनांक 31 डिसेंम्बर
घुगूस येथे नगर परिषद स्थापन करण्यात यावी अशी मागणी त्या परिसरातील हजारो नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. परंतु याकडे एकाही राजकीय नेत्यांनी लक्ष दिले नाही. ही बाब घुगूस येथील काँग्रेसचे राजू रेड्डी व कार्यकत्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्ष्यात आणून देताच त्यांनी स्वतः लक्ष घालून नगर परिषद स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाला यश आले असून त्यांचा पुढाकाराने घुगूस येथे नगर परिषदेची स्थापना करण्यात आली असून त्यासंदर्भात आज दिनांक 31 डिसेंम्बर ला अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडून घुगूस वासीयांना नवीन वर्षाची भेट दिलेली आहे.
घुगूस हे औद्योगिक क्षेत्र असून या परिसरातील लोकसंख्या सुध्या 50 हजाराच्या वर आहे. तरी सुध्या या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. या परिसराच्या विकासासाठी ग्रामपंचायत बरखास्त करून नगर परिषद स्थापन करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील हजारो नागरीकांनी गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने घुगूस येथील काँग्रेसचे राजू रेड्डी व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटून निवेदन दिले. त्यावेळेस वडेट्टीवार यांनी घुगूस येथे लवकरच नगर परिषद स्थापन करण्यात येईल असे शब्द त्यांना दिले. मंत्री महोदयांनी या कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव नगरविकास आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळेच 31 अगस्ट 2020 ला पहिली अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. त्या अधिसूचनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी अहवाल पाठविला होता. नगर विकास विभाग यांनी 4 सप्टेंबर 2020 ला प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या कडून नगर परिषद स्थापना करण्यासाठी अभिप्राय मागितला. अभिप्राय देण्यासाठी ग्राम विकास विभागाकडून विलंब होत असल्याची बाब वडेट्टीवार यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, विभागीय आयुक्त नागपूर, प्रधान सचिव ग्रामविकास यांच्यासोबत सतत पाठपुरावा केला. अखेर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने घुगूस येथे नगर परिषद स्थापना आज 31 डिसेंबर च्या अधिसूचना नुसार करण्यात आली.
राज्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूकीची घोषणा करण्यात आली त्यातच घुगूस ग्रामपंचायतची सुध्या घोषणा करण्यात आली त्यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कामास सुध्या सुरुवात केली. त्यामुळे घुगूस वासीयमघ्ये चिंतेचा लाट निर्माण होऊन आता नगर परिषद होणार नाही असे वाटत होते. काही नागरिकानी आठ दिवसापूर्वी वडेट्टीवार यांची भेट घेऊन सदर बाब निर्देशनास आणून दिली. त्यावेळेस त्यांनी घुगूस वासीयांना मी शब्द दिलेला आहे आणि दिलेला शब्द पाळणारा मी आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच घुगूस येते नगर परिषद स्थापन होणार आहे. असे आवर्जून पुन्हा सांगितले. घुगूस वासीयांना वडेट्टीवार यांनी घुगूस येथे नगर परिषद स्थापन करून नवीन वर्षाची भेट दिल्याने सर्वत्र जललोश होत असून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!