गोंडपिपरी न पं इमारतीची दैनावस्था कधी दूर होणार…?

908

 

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक

सुमारे पावून शतकापूर्वी बांधलेल्या या इमारतीची सध्या दैनावस्था झाली आहे. या इमारतीत आधी पोलीस ठाणे होते ,नंतर ग्रामपंचायत आणि नंतर नगरपंचायत चा कारभार चालला होता. इमारतीत अडचण होत असल्याने न पं चा कार्यालयाची व्यवस्था दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आली आहे. याच स्थळी नगर पंचायत कार्यालयासाठी नूतन इमारत उभी करण्यात यावी अशी मागणी आहे.
सुमारे पावून शतकापूर्वी सदर इमारतीचे बांधकाम करण्यात आले. बरीच वर्षे तिथे पोलीस ठाण्याच्या कारभार चालला. जसजशी गावची लोकसंख्या वाढली तसंतसे पोलिसांचे कार्य वाढू लागले. पोलीस ठाण्याला जागा अपुरी पडू लागली. नंतर ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्यात आली.
ही इमारत तेव्हा सुस्थितीत होती. ग्रामपंचायतचा कारभार त्यावेळी स्थानिक गांधी चौकातील ग्रामपंचायतच्याच चाळीत चालला होता .
लोकसंख्या वाढत असल्याने ग्रा पं साठी ती जागा अपुरी पडायला लागल्याने सदर इमारतीत ग्रा पं चे स्थानांतर करण्यात आले .
बरीच वर्ष या ठिकाणी ग्रा पं चा कारभार चालला .2015मध्ये ग्रा पं चे रूपांतर नगर पंचायतीत झाल्याने येथेच पंचायतचा कारभार सुरु होता .तथापि पावसात पाणी आतमध्ये शिरत असल्याने आणि जागाही अपुरी पडत असल्याने न पं चे कार्यालय खाजगी इमारतीत हलवण्यात आले .नंतर आता गुजरी मधील नगरपंचायत च्या इमारतीत पंचायतचा कारभार चालला आहे .हा गजबजलेला परिसर आहे .येथे पार्किंग ची व्यवस्था नाही .मुळात ही इमारत वाचनालयासाठी बांधण्यात आली .
पूर्वीच्या ठिकाणी (म्हणजे हाय वे वर असणाऱ्या ) जीर्ण झालेल्या इमारतीचे डिसमेंटल करून नगरपंचायत इमारत उभारण्यात यावी अशी बऱ्याच जणांची मागणी आहे .शहराच्या मधोमध हे स्थळ आहे .