इंडिया दस्तक न्यूज ची दखल…गोंडपिपरी नगरपंचायतसाठी नवीन इमारत होणार, प्रशासकीय मान्यता; दीड कोटी रुपये निधी मंजुर…

442

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक

सुमारे दोन महिन्यापासून नगर पंचायत कार्यालयाच्या इमारतीची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेंडिंग होती .यासंदर्भात आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच ‘गोंडपिपरी नगर पंचायत इमारतीची दैनावस्था कधी दूर होईल ‘यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते .सदर वृत्ताची दखल घेऊन इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे .यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चले जाणार आहेत .
नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की , इमारत बांधकामाची फाईल अनेक दिवसापासून मा जिल्हाधिकारी कार्यालयात पेंडिंग होती .
आम्ही यासंदर्भात दस्तक न्यूज मध्ये बातमी प्रकाशित केली .सदर वृत्ताची नगरपंचायत प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली .त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून मा.जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेऊन आणि बातमीचा संदर्भ देऊन इमारत बांधकामाला मंजुरी देण्याची विनंती केली .
मा.जिल्हाधिकारी महोदयांनी 2 जानेवारी रोजी या इमारत बांधकामाला प्रशासकीय मान्यता दिली . हाय वे वर असलेल्या जुन्या नगरपंचायतच्या जागेवरच ही नूतन इमारत उभी केली जाणार आहे .आणि यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत .
टेंडरिंगच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात (कदाचित आचारसंहिता लागण्याच्या आधी )केली जाणार असल्याचे कळते .