जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
मागील पंधरा ते वीस दिवसा अगोदर इंडिया दस्तक न्युज मधील एका प्रकाशित झालेल्या बातमीचा दणका बसत चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील bsnl चे टॉवर चार वर्षांपासून थ्रीजी सेवा देत नव्हती परंतु बातमी प्रकाशित झाल्या नंतर वरिष्ठ अधिकारी जागी होत सेवा 24 तासाच्या आत सुरू केली परंतु ही सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ही थ्रीजी सेवा सुरळीत सुरू ठेवावी अशी मांगणी रेगडी,विकापल्ली, माडेआमगाव परिसरातील नागरिकांना कडून केली जात आहे
थ्रीजी सेवा नसल्याने अनेक गोर गरीबांचे डेटा पॅक वाया जात आहे व शासकीय कामात अडथळे निर्माण होत आहे.
सध्या भारतात प्रत्येक काम काज हे ऑनलाइन होत असून गाव खेड्यात पण इंटरनेटची आवश्यकता आहे म्हणूनच रेगडी,बोलेपल्ली,कोटमी या गावातील bsnl ची थ्रीजी सेवा नियमित पने द्यावी अशी मांगणी परिसरातील नागरिक करीत आहेत
इंडिया दस्तक न्युज ची दखल घेत थ्रीजी सेवा सुरू तर झाली… पण कव्हरेजचा होत आहे लपंडाव…
RELATED ARTICLES