महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने गरजूंना ब्लँकेट वाटप…

407

प्रतिनिधी-बल्लारपूर/चंद्रपूर
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पुरोगामी पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर/बल्लारपूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून गरजूंना ऊबदार ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले.स्थानिक ग्रामीण रूग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना ब्लेंकेट वाटप करून हा कार्यक्रम करण्यात आला.

या प्रसंगी पालिकेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक,डॉक्टर मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लँकेट वाटप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या दरम्यान शहरातील विविध भागात फिरून गरजूंना ब्लेंकेट वाटप करण्यात आले. या प्रसंगी संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,संघाचे पूर्वविदर्भाचे कायदेशीर सल्लागार एड.राजेश सिंग साहेब, जिल्हा उपाध्यक्ष राकेश सोमाणी,जिल्हा कोशाध्यक्ष आसवानी,जिल्हा संपर्क प्रमुख सुजय वाघमारे,बल्लारपूर तालुका अध्यक्ष प्रशांत रणदिवे,प्रमुख सल्लागार काशीनाथ सिंग,कार्याध्यक्ष आरिफ भाई,सचिव शंकर महाकाली,तालुका कोशाध्यक्ष गौतम कांबळे,प्रसिद्धी प्रमुख रिकी कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती….