झरी जामणी- यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी तालुक्यातील अडेगांव गावात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी देशी दारूच्या साठ्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 5 पेट्या मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अडेगांव येथे ठाणेदार पोलीस निरीक्षक सोनुने यांच्या नेतृत्वात जप्त करण्यात आला.
गावातील मंगेश पाचभाई व त्याच्या सहकाऱ्यानी निवडणुकीतील मतदार काबीज करण्यासाठी स्वतःच्या फोर व्हीलर MH 34 CF 8286 या वाहनाने दारूच्या पेट्या स्वतःच्या शेता कडे नेत असल्याची माहिती काही युवकांना मिळाली वाहनाचा पाठलाग करून त्यांनी घटनास्थळ गाठले व गावातील काही नागरिकांना बोलावले व पोलीस स्टेशन मुकुटबन ला माहिती दिली ठाणेदार सोनुने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दारूचा अवैध साठा जप्त केला. पण अजूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होऊन नागरिकांत अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे .