….अन आईविना अनाथ झालेल्या पिल्ल्यांचे ते पालक झाले…!

1180

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे कार्यकारी संपादक)

आईने पिल्ल्यांना जन्म दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला .पिल्ली पोरकी ,अनाथ झाली .दुधासाठी हंबरडा फोडू लागली ,रडू लागली ,कासावीस व्हायला लागली .पिल्ल्यांची ही अवस्था त्या बच्चूना बघवली नाही .मग बच्चूनी त्या अनाथ पिल्ल्यांना छातीशी कवटाळून त्यांचे पालकत्व स्वीकारले .
यासंदर्भात असे की ,मौजा धाबा येथे एका मांजरीने दोन पिल्ल्यांना जन्म दिला .अन दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला .
आईविना पिल्ली पोरकी झाली ,अनाथ झाली .दुधासाठी हंबरडा फोडू लागली .पत्रकार निलेश झाडे यांचा मुलगा यज्ञेश , शिवम ,भाची परी मेश्राम या छोट्या मुलांचे हृदय पिल्ल्यांची अवस्था बघून गहीवरले .त्यांनी पिल्ल्यांना छातीशी कवटाळले ,मायेने गोंजारले . यज्ञेश आणि परीने एकेक पिलू आपापल्या घरी नेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले .
या बच्चू कंपनीने दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद नक्कीच आहे .