ब्रेकिंग न्यूज! विहिरीत तोल गेल्याने युवकाचा मृत्यु…

1756

राजुरा: राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील 18 वर्षीय रोशन केशव मडावी याचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. रोशन याच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण रोशन हा घरातील एकुलता एक मुलगा होता.
सविस्तर असे की, काल म्हणजेच 17 जानेवारीच्या रात्री रोशन हा विहिरीच्या काठावर बसून मोबाईल पाहत होता. मोबाईल बघत असतानाच अचानक तोल गेल्याने त्याच्या खोल विहिरीत जाऊन मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने वाचवणे शक्य झाले नाही.
रोशनच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून सदर घटनेची माहिती विरुर स्टेशन पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचून रोशन चा मृत्युदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा करण्यात आला. पुढील तपास विरुर स्टेशन पोलीस करीत आहेत.