सागर कातकर यांनी साजरा केला कृतीशील आणि प्रेरणादायी वाढदिवस…

542

चंद्रपुर: वाढदिवस म्हटला की, डोळ्यासमोर दिसतो केक, डीजेच्या आवाजावर नाचणारी तरुणाई, पार्टी, विनाकारण पैसे उधळणारी पोरं. पण त्याने हे सर्व काही टाळून समाजासमोर आदर्श निर्माण केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मित्राच्या पोटाच्या भुकेपेक्षा पोराच्या ज्ञानाची भुकेला महत्व देऊन त्याने विद्यार्थ्यांना शालेय स्टेशनरीचे वाटप केले. अश्या या सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव आहे सागर कातकर.
चंद्रपूर तालुक्यातील पायली येथील सामाजिक कार्यकर्ते सागर कातकर यांच्या वाढदिवसानिमित्त गट ग्रामपंचायत पायली-भटाळी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी विचारमंचावर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विकास पेंद्राम, नदीम रायपुरे, रामकृष्ण सोनटक्के, राकेश गौरकार, सुभाष गौरकार, आशाताई अलोणे, वैशाली सोनटक्के, शारदा मेश्राम, श्रावण कातकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुरज दहागावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनू आगाशे यांनी केले.
या कार्यक्रमाला मिथुन रायपुरे, सचिन उपरे, विलास पिंपळकर, लक्ष्मण आमाने, विठ्ठल गोहणे, शाहरुख कातकर, अशोकभाऊ गिलबिले, शीलवंत धोपटे, अमित साव, योगेश अलोने, शीला कातकर, किसन बोबडे, संदीप भाऊ मुख्याध्यापक पडोळे सर, निखिल तांबोळी सर, अंजलीना साळवे मॅडम, सदन मुंजलवार सर आदी शिक्षकवृंद तसेच समस्त गावकरी मंडळी यांचे सहकार्य लाभले.