Homeक्राइमदुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रियकराने केला मित्रांच्या मदतीने गर्भवती प्रियसीवर प्राणघातक हल्ला...

दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रियकराने केला मित्रांच्या मदतीने गर्भवती प्रियसीवर प्राणघातक हल्ला…

चंद्रपूर:- जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रियकराने मित्रांच्या मदतीने गर्भवती प्रेयसीवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.याप्रकरणात सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या सर्वस्तरातून होत आहे.

सविस्तर वृत्त असे की दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 19 वर्षीय एका युवतीचे गौरव पिंपळकर नामक युवकाशी मागील 2 वर्षा पासून प्रेमसंबंध होते. कालांतराने प्रेमसंबंध शारीरिक संबंधात परावर्तित झाले. युवकाने तिच्यासोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या आणि शेवटी नको ती स्थिती निर्माण झाली. प्रेमात आंधळी झालेली ती युवती आपले सर्वस्व गमावून बसली असुन सध्या 2 महिन्यांची गर्भवती असलेली ही युवती प्रियकराने मित्रांसह केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत असुन मागील 4 दिवसांपासुन तिची प्रकृती गंभीर आहे.

घरी कुणालाही न सांगता 26 जानेवारी रोजी पीडित युवती प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. बराच वेळ होऊनही मुलगी घरी आली नसल्याने तिचा शोध घेणे सुरू होते. परंतु रात्र झाली तरी तिचा सुगावा लागत नव्हता.रात्रीच्या सुमारास तिचा प्रियकर गौरव पिंपळकर मुलीच्या घरी आला.घरच्यांना त्यांच्या प्रेम संबंधाची माहिती नसल्याने त्याने घरच्यांसोबत मुलीचे शोधकार्य सुरू केले.दरम्यान मुलाने तिच्या वडिलांना अयप्पा मंदिराच्या शेजारी वेकोलिच्या डंपिंग यार्ड परिसरात नेले मात्र काही वेळ शोधाशोध केल्यावर वाघ येण्याची भीती घालुन कुटुंबियांना घरी परत जाण्यास भाग पाडले.

त्यानंतर तोच युवक 11 वाजताच्या दरम्यान पुन्हा मुलीच्या वडिलांना भेटला आणि त्यांना एकट्याला घेऊन परत त्याच निर्जन भागात गेला.आणि त्याने एका खोलगट भागात फेकलेल्या मुलीला दाखवले. त्यावेळी त्या युवतीला पालापाचोळा व काट्यांनी झाकलेले होते. मारहाण झाल्यानंतर युवती मृत झाल्याचे समजुन त्यांनीच हे कृत्य केले असावे असे दिसते.मुलीला बघताच वडीलांनी तत्काळ काटे व पालापाचोळा दुर करून मुलीला बाहेर काढले व त्याच मुलाच्या मदतीने मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलगी बेशुद्धावस्थेत होती.

ह्या घटनेची माहिती मिळताच प्रसिद्ध समाजसेविका सरिता मालू ह्यांनी रुग्णालयात धाव घेतली.तोपर्यंत मुलगी शुद्धीवर आली होती. दुसर्‍या दिवशी सरिता मालू ह्यांनी मुलीकडून अत्यंत आपुलकीने माहिती घेतली.दरम्यान मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पालकांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत मारहाणीचा गुन्हा दाखल केला गेला. परंतु सरिता मालू व कुटुंबियांनी मात्र मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा व मुलीला न्याय मिळवून द्यावा ह्यासाठी पोलिसांकडे तगादा लावला होता.पोलिसांत तक्रार दाखल होताच ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरविण्यास सुरुवात करून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी युवकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.अवघ्या 24 तासाच्या आत मुख्य आरोपी गौरव पिंपळकरचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

29 जानेवारी रोजी युवतीची प्रकृती थोडी स्थिर झाल्यामुळे ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांनी रुग्णालयात जाऊन युवतीचे बयाण नोंदवून घेतले. ह्यावेळी रुग्णालयात सरिता मालू ह्यांच्या सह माजी महापौर अंजली घोटेकर उपस्थित होत्या.युवतीच्या जबाबानुसार दुर्गापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भां. द. वी. 376, 324, 326 व कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी गौरव पिंपळकर व अखिलेश यादव ह्यांना ताब्यात घेतले असुन इतर दोन आरोपी फरार आहेत. ठाणेदार स्वप्निल धुळे व त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय वेगवान हालचाली करून आरोपींना 24 तासाच्या आत ताब्यात घेतल्याने कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले असुन सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!