चंद्रपूर | कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ होत असल्याने, महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं चित्रदिसत आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसा इशारा दिला आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली आहे.
मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत दबाव होता हे मान्य करत, आता तिथली रुग्ण संख्या वाढली याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
आपत्ती व्यवस्थापनाचे नियम आणि कोरोना नियमावली पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. लग्न आणि इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल याचा पुनरूच्चार वडेट्टीवार यांनी केला.